आठवणीतला नाताळ

आठवणीतला नाताळ
©®संध्या सुभाष
नाताळाच्या आधीची रात्र. यावेळी मात्र मी ठरवलेलंच काहीही झालं तरी न विसरता सॉक्स उशीखाली ठेवयचाच. ख्रिसमसच्या रात्री दाढीवाला लाल कपडे घातलेला santa येतो आणि चॉकलेट सॉक्स मध्ये ठेवून जातो.दरवर्षी मी सॉक्स ठेवायला विसरायची आणि मला मग गिफ्ट मिळत नसे.
            नव्वदीच दशक त्यावेळी मुंबईत अधूनमधून रात्रीची लाईट जायची. अशीच लाईट गेलेली आणि आम्ही सारे चाळीच्या व्हरांड्यात बसून गप्पा मारत होतो.बैठी चाळ जेथे बाजूच्या आणि आमच्या घरात एकच सामाईक भिंत असायची. त्यामुळे भौतिक दृष्ट्या जसे एकमेकांच्या जवळ होतो तसेच मनाने पण होतो. बाजूच्या घरातील दादाची नोकरी गेल्याने त्यांच्या घरात कडकी आली होती. त्यामुळे आमच्या घरातील वरण आणि भाजी त्यांच्या घरात दिली जायची. त्यावेळी कडकी म्हणजे काय हे माहीत नव्हतं पण कडकी आली की अगदी अशी मदत केली जायची. ते ही कोणताही आव न आणता. वरण दिलं बाजूला आणि आम्ही गप्पा मारत बसलो.                                                                       5 वीत असेन मी. मला माझ्यापेक्षा 
            मोठ्या ताईंनी सांगितले आज नाताळाची आधीची रात्र आज रात्री santa फिरणार आणि खाऊ सॉक्स मध्ये ठेवणार. तशी मी उठली माझा सॉक्स शोधला तर वापरल्याने घाण कुबट वास येत होता. मग मनात विचार आला santa आला तर तो या सॉक्सच्या वासामुळे काहीच देणार नाही.मग रात्रीच अंधारात तो सॉक्स धुतला आता परत विचार उशीखाली ओला सॉक्स कसा ठेवावा. मग खिडकीत लावला .मग परत माझं मन नाना विचारांनी भरून गेलं .....santaa ला सॉक्स सापडेल का?कारण उशीखाली सॉक्स नाही. मग तो असाच निघून गेला तर???
अनेक प्रश्न बालमनात रुंजी घालू लागले. तरी मनोमन प्रार्थना केली विनवण्या केल्या आणि सॉक्स कुठे ठेवलाय हे सांगितले आणि झोपी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आधी सॉक्स बघितला कसचं काय??तो रिकामाच. मन फार खट्टू झालं. चाळीच्या व्हरांड्यात आल्यावर त्या मैत्रिणी माझ्यावर हसत होत्या... कसं मूर्ख बनवलं असा आव आणत...©संध्या सुभाष